आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

गावातील मुलांकडे ऑनलाईन क्लास करण्यासाठी सोनू सूदने घेऊन दिले स्मार्टफोन

देशात कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक महिन्यांपासून शिक्षण पूर्णपणे बंद आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक अडचणी येत आहेत. देशात कोरोनाच्या परिस्थितीत अनेक लोक शक्य असेल ती मदत करत आहे. अभिनेता सोनू सूद प्रत्येक गरजूला मदत करत आहे. सध्या शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाईन क्लास करत आहे. पण गावातील काही मुलांकडे ऑनलाईन क्लास करण्यासाठी काही साधन नसल्याने नुकतेच सोनू सूदने त्यांना स्मार्टफोन घेऊन दिला आहे.

एका वृत्त अहवालामध्ये हरियाणातील एक गावाची कथा दाखवली होती, त्यात मुलांना ऑनलाईन क्लास करताना कशा अडचणी येतात हे दाखवले होते. अहवालात दाखवल्याप्रमाणे मोरनी गावात चांगले नेटवर्क मिळते. पण त्यांच्याकडे स्मार्टफोन विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांना ऑनलाईन क्लास करता येत नव्हते.

एका पत्रकाराने या मुलांविषयी बातमी केली होती. त्यात सोनू सूद यांना टॅग केले होते. यावर प्रतिसाद देऊन सोनू सूद म्हणाला, या मुलांना आता प्रवास करावा लागणार नाही. उद्या त्यांना स्मार्टफोन मिळेल. दुसऱ्या दिवशी सोनू सूदने त्या मुलांना स्मार्टफोन घेऊन दिला. सोनू सूद यांनी त्याचे मित्र करण गिलहोत्रा यांच्याद्वारे स्मार्टफोन पाठवला. शिक्षण घेतले तरच देश पुढे जाईल असे देखील सोनू सूद यावेळी म्हणाला.