कोरोनामहाराष्ट्र

सोनू सूदची कोरोना काळात मदत चालूच; एकाला घेऊन दिली म्हैस

कोरोनाच्या संकटकाळात सढळ हाताने अनेक अभिनेते मदत करत आहेत यामध्ये सोनू सूद सुद्धा अनेक लोकांना मदत करत आहे. देशातच काय तर देशाबाहेरील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलं. नुकतंच बिहारमधील एका ट्विटर वापरकर्त्याने सोनू सूदकडे मदत मागितली होती.

या ट्विटमध्ये लिहिलंय,’चंपारणच्या भोलाने पुरामध्ये मुलगा आणि म्हैस हरवली आहे. म्हैस हे त्याचं एकमेव कमावण्याचं साधन होतं. गेलेला मुलगा कोणी परत आणू शकत नाही, पण म्हैस घेऊन तो जीवन जगू शकतो. पुढे त्यात ट्विटमध्ये लिहिलंय,’सोनू सूद आणि नीती गोयल यांनी म्हैस घेऊन मदत करावी, म्हैस विकत घेऊन तो आपल्या दुसऱ्या मुलांना सांभाळून त्यांचं पालन पोषण करेल’ सोनू सूदने या ट्विटला उत्तर दिलं आहे.

मी माझी पहिली गाडी घेण्यास जेवढा उत्सुक नव्हतो, तेवढा उत्सुक एक नवीन म्हैस खरेदीच्या वेळी आहे. मी जेव्हा बिहारला येईल, तेव्हा म्हशीचे एक ग्लास दूध नक्की प्यायला येईल, असं सोनू म्हणाला आहे. याआधीही त्याने कोरोना काळात अनेक गरिबांना मदत केली आहे तसेच बाहेरच्या राज्यातील मजुरांना बसची सोय देखील त्याने केली होती.