कृषीमहाराष्ट्र

विदर्भात पुढील 5 दिवसात तुरळक पावसाचा अंदाज

Newslive मराठी-  विदर्भात पुढील 5 दिवस तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचे प्रमाण टक्केवारी समाधानकारक असल्याने शेती पिकाच्या दृष्टीने सुरू असलेला रिमझिम पाऊस फार महत्वाचा मनाला जातो आहे.

यापूर्वी गोंदियामध्ये सामान्य पेक्षा 29 टक्के पाऊस कमी झाला आहे. एका महिन्यात गोंदियामध्ये 311 मिलिमीटर पाऊस व्हायला हवा होता.

विदर्भात झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन पिकाला चांगला फायदा होईल. पावसामुळे पिकांची वाढ जोमाने होईल. परंतु प्रत्यक्षात 221 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.