बातमीमहाराष्ट्रराजकारण

पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी

Newslive मराठी- पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, अशी कोपरखली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मारली. आता मी देखील पावसात भाषण केलं. पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार, असाही आशावादही रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं, यावेळी ते बोलत होते.

हा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा सणसणीत टोला रावराहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला. आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोन जणांच्या हातात आहे. आणि तिसरा पार्टनर काँग्रेस मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत.

दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी झाडावर आदळणार आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे लायसन्स नाही की इन्शुरन्स सुद्धा नाही, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर विनोदी फटकारे मारले आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्यावर रावसाहेव दानवे यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवेना अजून कळणार नाही, असे ते म्हणाले. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi