आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

श्रीलंकेच्या मुलीने भारतातील शेतकऱ्याच्या मुलाशी केले लग्न

Newslive मराठी-  प्रेम आंधळ असतं. त्याला भाषा-वय-प्रांत अशी कसलीही मर्यादा नसते.असंच काही सांगणारी एक प्रेमकहाणी समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याच्या मुलाची आणि श्रीलंकेच्या मुलीची ही प्रेमकथा आहे. हे दोघे ट्विटरवर एकमेकांच्या प्रेमात पडले.

मध्यप्रदेशमधील मंदसौरमध्ये राहणारा गोविंद महेश्वरी आणि श्रीलंकातील हंसिनी यांच्यामध्ये सोशल मीडियावर प्रेम फुललं.

दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी मंदसौरमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. हंसिनीचे वडिली पेशाने वकिल आहेत. तर गोविंदचे वडिल शेतकरी आहेत. दोन वर्षे टेक्स्ट मेसेज आणि व्हिडियो कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहिल्यानंतर २०१७ मध्ये हंसिनी थेरेपीच्या शिक्षणासाठी भारतात आली. त्यावेळी पहिल्यांदा गोविंद आणि हंसिनीची भेट झाली. त्यानंतर दोघांमधील बॉन्डिंग आणखी मजबूत झाले. नुकतेच गोविंदचे बीईचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *