महाराष्ट्रराजकारण

राज्यातील मंदिरे तातडीने सुरू करा- प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या प्रकोपापासून राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मंदिर प्रवेशावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

ऑगस्ट महिन्यात आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरला ‘विश्व युवा वारकरी सेने’चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.

या आंदोलनात हे घटक सहभागी झाले तर आंदोलनाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी या सर्वांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आंबेडकरांनी त्यांची राजकीय कर्मभूमी असलेल्या अकोल्यातही हिंदूंच्या आस्थेचा विषय असलेल्या कावडयात्रेच्या विषयाला हात घातला. श्रावणातील शेवटच्या सोमवारी असणरी ही ऐतिहासिक यात्रा सरकारच्या अटींनुसार पार पडली.

राज्यात भाजप आणि शिवसेना नेहमीच ‘हिंदू’केंद्रीत राजकारण करते. सरकारमधील दोन्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमूळे शिवसेनेची स्थिती ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परिस्थिती आहे. सरकारने या मुद्द्यावर लवकर तोडगा नाही काढला तर ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस पंढरपुरात अनेक घडामोडींचा असेल.