कोरोनामहाराष्ट्र

राज्य सरकारची नियमावली जाहीर; ई-पास रद्द, हॉटेल सुरू, शाळा बंदच

राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे.

मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही. तसेच हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो आणि सिनेमागृह अद्याप बंद राहणार आहेत.

2 सप्टेंबरपासून अनावश्यक दुकानं सुरु राहतील. तसेच दारुची दुकानेही सुरु राहणार आहे. हॉटेल आणि लॉज हे 100 टक्के क्षमतेद्वारे सुरु करता येणार आहे. त्याशिवाय मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. त्याशिवाय जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही.