महाराष्ट्रराजकारण

गरिबांच्या मृतदेहाचे राजकारण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार- योगी आदित्यनाथ

हाथरस येथील एका युवतीवर सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण राज्यात पेटले आहे. त्यावरून देशातही अनेक ठिकाणी निदर्शने आंदोलने करण्यात आली. मात्र विरोधक या प्रकरणाचे राजकीय भांडवल करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

या प्रकरणाच्या आधारे जातीय विद्वेष निर्माण करून राज्यभर हिंसाचार घडवून आणण्याचा कट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. असे राजकारण करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अस त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून संवाद साधताना सांगितले आहे.

हाथरस येथील कायदा सुव्यवस्था स्थिती सांभाळण्यासाठी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाचे दोन अधिकार रवाना करण्याचे आदेशी त्यांनी दिले आहेत. गरिबांच्या मृतदेहाचे राजकारण करणाऱ्यांना शोधून काढण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यावर कठोरपणे कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.