महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय, मग नेत्यांनाही संसदेत बोलवा- इम्तियाज जलील

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय उचलून धरल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. आता एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, एखाद्याच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेत का? अर्थात सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची फारशी काळजी नाही. नाहीतर कोरोनाची साथ असताना त्यांनी परीक्षा घ्यायचा निर्णय का घेतला असता? जर सरकारला कोरोनाची अजिबात भीती वाटत नसेल तर त्यांनी संसदेचे अधिवेशन बोलवावे.

मग भाजपचे किती खासदार उपस्थित राहतात हे पाहू, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. जलील यांनी मंदिरे चालू करण्याची देखील मागणी केली आहे. या मंदिरात येण्यासाठी नियम व अटी लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.

परीक्षेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने न्यायालयात आव्हान दिले होते. आदित्य ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. आता परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.