बारामतीमहाराष्ट्र

बारामती तालुक्‍यात शुकशुकाट, शहरातही जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद

कोरोनाचा बारामती शहर आणि तालुक्‍यात प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा बारामती शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूला बारामती शहरातील व्यापारी, बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहर व तालुक्‍यात विनामास्क फिरणारे व वाहनांवरील दंडात्मक कारवाईत 1 लाख 9 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

13 सप्टेंबरपर्यंत महामारी आटोक्‍यात आली तर कर्फ्यूबाबत निर्णय त्यावेळी घेतला जाणार आहे. यापूर्वी शहरात भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न अवलंबण्यात आला होता. हे दोन्ही पॅटर्नला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

मात्र आता रुग्ण वाढतच चालले आहेत म्हणून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अजित पवारांचा मतदारसंघ हा बारामती आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष याठिकाणी असते. यामुळे कडक निर्णय घेण्याची गरज आहे.