महाराष्ट्रराजकारण

सर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Newslive मराठी-  प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्या व्यक्तीच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख केला आहे. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लीम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, कोळी, आगरी, शिंपी, लिंगायत, वारली आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

37 जणांच्या यादीत दोन महिलांचा समावेश आहे. दोन मुस्लीम आहेत.

दरम्यान,  मावळमध्ये पार्थ पवार यांच्याविरोधात राजाराम पाटील उभे आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नवनाथ पडळकर उभे आहेत.