महाराष्ट्रराजकारणलक्षवेधी

सुप्रिया सुळेंची सर्वाकृष्ट संसदपटू म्हणून निवड

Newslive मराठी-  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

त्यांनी पहिल्या सत्रांमध्ये 34 चर्चासत्रात सहभाग घेतला. चार खासगी विधेयके मांडली. 147 प्रश्न उपस्थित केले. तसेच पहिल्या सत्रांमध्ये त्यांची संसदेतील उपस्थिती 100 टक्के राहिली आहे.

दरम्यान, 2016, 2017, 2018 मध्येही सुळे यांची सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड झाली होती.