महाराष्ट्रराजकारण

सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांच्या प्रश्नावर जोडले हात!

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या मागणीचं पत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून दिलं होतं. यानंतर पार्थ पवारांना शरद पवारांनी खडसावलं. पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हात जोडले आहेत. पार्थ पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शरद पवारांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फटाकरलं होतं. तरीही सीबीआयकडे सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास गेल्यानंतर सत्यमेव जयते असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं होतं.

याबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता, त्यांनी त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुप्रिया सुळे यांनी आज मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली. बारामती मतदारसंघातील सासवड गावाला स्वच्छतेचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, मला त्याचा सार्थ अभिमान आहे. तिथले नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला.

लावणी कलाकारांच्या प्रश्नावरही त्यांच्याशी चर्चा केली. जिम सुरु करण्याची मागणी आहे, त्या सुरू कराव्या अशी मागणीही केली, असं सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्यावर म्हणाल्या.