बातमीमहाराष्ट्र

गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे

Newslive मराठी- मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक आज लोकसभेत मांडलं. हे विधेयक जुमला ठरू नये, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देते. मात्र हे विधेयक संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडण्यात आलं, धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण कधी मिळणार, असा सवाल सुळेंनी उपस्थित केला. त्यावर या प्रकरणी सर्वेक्षण सुरू असल्याचं उत्तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिलं.

सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना रामविलास पासवान एका इंग्रजी म्हणीचा वापर केला. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, या म्हणीत पासवान यांनी थोडा बदल केला. ‘मी रेल्वे मंत्री असताना आमच्या विभागात एक वाक्य गमतीनं वापरलं जायचं. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ रेल्वे; अँड व्हेअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे,’ असं पासवान म्हणाले.