महाराष्ट्रराजकारण

सुप्रिया सुळेंना डेंग्यू

Newslive मराठी- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

मला डेंग्यूचे निदान झाल्यामुळे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु मदत आणि पुनर्वसन उपाययोजना वेगात करण्यासाठी मी आणि माझी टीम, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क आणि समन्वय साधत आहोत.

पुणे जिल्हाधिकारी, पुणे आयुक्त यांनीही संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. असं त्यांनी ट्विट केलं आहे.