खेळमहाराष्ट्र

आयपीएल सोडून सुरेश रैना भारतात परतला; चेन्नई सुपर किंग्सला अजून एक मोठा धक्का

कोरोना काळात कशीबशी आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजूनही अनेक खेळाडूंना कोरोना होत आहे. चेन्नईच्या टीममध्ये अनेकांना कोरोना झाला आहे. आता चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आला असल्याचं ट्वीट चेन्नई सुपरकिंग्सने केला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्स अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे,” असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले आहे.

यामुळे चेन्नईसाठी हा अजून एक मोठा धक्का बसला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे रैना भारतात परतला आहे. पुढील महिन्यात आयपीएल सुरू होणार आहे. त्या अगोदर सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत. यामध्ये रैनाचा देखील समावेश होता.