बातमीमनोरंजन

सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

Newslive मराठी- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आता यासर्वांवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने वक्तव्य केले आहे.अंकिताने नुकताचरिपब्लिक टीव्हीला मुलाखत दिली. यामुलाखतीमध्ये तिने सुशांत संबंधी अनेक गोष्टींची माहिती दिली. सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तसेच तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. तसेच तिने सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून काय लक्षात ठेवतील असे देखील म्हटले आहे.

सुशांत एक साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते असे अंकिता म्हणाली. आतापर्यंत मी त्याला जितकं ओळखते त्यावरून इतकं सांगते की, तो नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणे चुकीचे ठरेल असे अंकिता पुढे म्हणाली. सुशांतच्या वडिलांनी सुशांतला शेती करायची असल्याचे म्हटले होते. हे खरं आहे सांगत ती म्हणाली, सुशांतला शॉर्ट फिल्म देखील तयार करायच्या होत्या.

यापूर्वी अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिनेसत्याचा विजय होतोअसे म्हटले होते. अंकिताच्या या पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा

-‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

-कोरोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर यांना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi