महाराष्ट्रराजकारण

सुशांतची आत्महत्या नसून हत्याच असावी- रामदास आठवले

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. एक गट असा आहे, जो सुशांतने आत्महत्या नाही, तर त्याची हत्या झाली आहे, असे मानतो. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून, हत्या असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.

अभिनेते सुशांतसिंह रजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडिल के के सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले. रामदास आठवले म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला न्याय हवा आहे आणि सीबीआय तपासाने ते संतुष्ट आहेत.

अनेकांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्याच झाली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद बघायला मिळाला अखेर हा तपास सीबीआयकडे गेला आहे. सीबीआय टीम सध्या मुंबईमध्ये येऊन तपास करत आहे.