आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

सुशांतसिंग केस: सीबीआयने मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले समन्स  

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने आता यापूर्वी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे नजर वळविली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सध्या सीबीआयतर्फे कसून चौकशी करण्यात येत असून मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये संबंधितांना चौकशीसाठी बोलावले जात आहे.

समन्स बजावण्यात आलेल्या मुंबई पोलिसांतील दोन्ही अधिकाऱ्यांना देखील याच गेस्ट हाऊसवर बोलविण्यात आलं आहे. सीबीआयतर्फे बजावण्यात आलेल्या समन्समध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा सीए संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली.

यामुळे आता चौकशीला अजून गती येणार आहे. सीबीआय टीम रोज अनेकांची चौकशी करत आहे. यामध्ये सुशांतचे मित्र तसेच घटनास्थळी असणारे यांची देखील कसून चौकशी केली जात आहे.