आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी 18 संशयितांना चौकशीसाठी समन्स

रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक महिती पुढे येत आहे. यामध्ये एनसीबीने 18 जणांची यादी तयार केली आहे. या यादीमधील सर्वांना चौकशीचे समन्स पाठविण्यासाठी एनसीबी अधिकारी के.पी. एस मल्होत्रा हे दिल्लीला रवाना झाले आहे. या ठिकाणी एनसीबी संचालक राकेश अस्थाना यांच्याशी चर्चा करीत निर्णय घेणार असल्याची माहिती एनसीबी सुत्रांनी दिली.

18 जणांच्या यादीमध्ये बॉलिवूडसह काही उद्योजकांचा देखील समावेश आहे. या सर्वांना समन्स पाठविण्याची तयारी एनसीबीने केली आहे. याप्रकरणी जैद आणि बशीद या दोन संशयितांकडून एनसीबी मुंबईतील ड्रग्ज प्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे.या प्रकरणी जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर आहे. त्याची चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो मुंबईमध्ये सक्रिय आहे.

जैदने 17 मार्च दिलेल्या ड्रग्स डिलेव्हरीचे तार सुशांत सिंग प्रकरणाशी जुळत आहेत. त्या माहितीच्या आधारे एनसीबीने बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतले.एनसीबीच्या हाती एक व्हॉट्सअँप चॅट लागले आहे. ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत रियासह 10 जणांना अटक झाली आहे.आता बॉलिवूडमधील 18 नावे कोण आहेत हे लवकरच समजणार आहे.