महाराष्ट्रराजकारण

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी एका कॅबिनेट मंत्र्याला सीबीआय चौकशीसाठी बोलविणार

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआय आता याचा तपास करत आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यताही आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार महाविकास अघाडीतील एका कॅबिनेट मंत्र्याला सीबीआय चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

याप्रकरणी या मंत्र्यांकडे अधिक काही माहिती आहे का, याची खातरजमा करण्यासाठी या मंत्र्याला सीबीआय पाचारण करण्याच्या तयारीत सीबीआय आहे. हा मंत्री शिवसेनेचा असून त्याला खरोखरीच बोलविले तर या प्रकरणामुळे रंगलेले भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकीय युद्ध पुन्हा पेटणार आहे.

मंत्र्याने कोरोनाच्या कडक लाॅकडाऊन काळात सुशांतसिंह याच्या घरी पार्टी कशी झाली व त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते. याची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असे ट्विट केले होते. यामुळे हा वाद सुरू झाला होता.