आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

सुशांतची बहीणच पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होती!

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने एनसीबीने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिची आज चौकशी होणार होती. या चौकशीसाठी ती एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली. मात्र, चौकशी करणारा अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ती परत गेली.

तिच्या वकिलांनी या प्रकरणी आता सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आरोप केले आहेत. एनसीबीकडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत.

बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये सारा अली खान हिचे देखील नाव आले आहे. आता तिची चौकशी कधी होणार हे लवकरच समजणार आहे.