बातमीमनोरंजन

‘कथ्थक’ डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत

Newslive मराठी-  सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सगळेच आपला छंद जोपासताना पहायला मिळतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनलाही अभिनयाव्यतिरिक्त डान्सची आवड आहे. सोशल मीडियावर आपले काही डान्स व्हिडिओज तिने शेअर केले आहेत.

व्हिडिओमध्ये सुष्मिता पांढ-या रंगाच्या ड्रेसवर ती कथ्थकचा सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

व्हिडिओमध्ये सुष्मिता डान्स शिकण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.  ती गेल्या २५ वर्षांपासून कथ्थक शिकतेय. तिचा हा डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून अभिनयासह कथ्थक डान्समध्ये सुष्मिता पारंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.