महाराष्ट्र

इमारतीच्या गच्चीवरून पडून पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

Newslive मराठी- मुंबईतील गोरेगाव येथील एका इंग्रजी दैनिकातील पत्रकाराचा राहत्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (दि. ७ रविवार) सकाळी घडली. आदर्श मिश्रा असे त्या मृत पत्रकाराचे नाव आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याबाबत पोलीसांचा तपास सुरू आहे.

आदर्श मिश्रा हे ‘डीएनए’ या इंग्रजी मासिकाचे व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून काम पाहत होते. आज राज्यभरात पत्रकार दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे एका पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मॉर्निंग वॉकसाठी ते दररोज राहत असलेल्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील गच्चीवर जात असत. नेहमीप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. नेहमीप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी त्यांचा ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.