कोरोनामहाराष्ट्र

कोरोनात तबलिघी जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवले, त्यांच्याविरुद्धचा तो FIR रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश

दिल्लीच्या तबलिघी जमात मरकझ प्रकरणात देश आणि परदेशातील तबलिघींविरोधातील एफआरआय रद्द करण्याचे आदेश दिले कोर्टाने दिले आहेत. यावेळी दुर्घटना किंवा महामारीच्या वेळी राजकीय शक्ती नेहमीच बळीचा बकरा शोधातात. तबलिघींसोबत असेच काहीस घडले असल्याची टिप्पणी यावेळी कोर्टाने केली. याशिवाय चुकीचे वार्तांकन करणाऱ्या मीडियाला देखील कोर्टाने फटकारले आहे.

यावेळी, ‘दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. असे न्यायालयाने म्हटले. याशिवाय महामारीच्या काळात राजकीय शक्ती नेहमीच कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत असते.

तबलिघी जमातीला सुद्धा असेच बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने यावेळी म्हटले. याचिकाकर्त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई व्हायलाच नको होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. ‘योग्य वेळेवर योग्य निर्णय’ असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.