कृषीमहाराष्ट्र

ऊसाची एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा- स्वाभिमानी शेतकरी संघटना

नांदेड विभागातील चार जिल्ह्यातील चालू हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे आज निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

२०१९-२० च्या ऊस गाळप हंगामात नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया अंतर्गंतच्या सर्व सहकारी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपल्यानंतर ५ ते ६ महिन्याचा कालावधी उलटला तरी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार ऊसाच्या संपूर्ण देयकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही.

ऊस दर नियंत्रण आदेशानुसार ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपीनुसार संपूर्ण देयक अदा करणे बंधनकारक असताना विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी या नियमाचा भंग केला आहे. जर भविष्यात ही रक्कम जमा नाही केली तर अजून जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.