आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

करणचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या; कंगनाची रणावतची सरकारकडे मागणी

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या करून अनेक दिवस झाले. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. बॉलिवूडमध्ये इतरांपेक्षा स्टार किड्सला जास्त संधी देण्यात येते, अशी टीकाही तिने केली होती.

कंगणा नेहमी तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एका मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. कंगनाने पुन्हा एकदा दिग्दर्शक करण जोहरला धारेवर धरत त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत. नुकतंच कंगनाने ट्विट करत करण जोहरचा पद्मश्री काढून घेण्याचीही मागणी केली आहे.

सरकारला विनंती करते की त्यांनी करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. त्याने मला ही इंडस्ट्री सोडून जाण्यास सांगितलं. शिवाय ‘उरी’ सिनेमादरम्यान देखील त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. इतकंच नव्हे तर त्याने सुशांतचं आयुष्यही संपवलं आणि भारतीय सैन्यावर देशद्रोही सिनेमा बनवलाय, अशा कडक शब्दांत कंगनाने करणवर टीका केली यामुळे आता हा वाद अजून पेटणार आहे.

जूनमध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधला घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी तिने करण जोहरवर सडकून टीका केली होती. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणानंतर मोठा वाद सुरू आहे.

या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. आता कंगनाची ही मागणी पूर्ण होणार का हे लवकरच समजेल. या प्रकरणात राजकीय नेत्यांची देखील नावे समोर येत आहेत.