देश-विदेशमनोरंजन

करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या – कंगना

Newsliveमराठी – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नंतर कंगनाने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर आता करणला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या अशी मागणी तिने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत करण जोहरवर हल्लाबोल करत असून यावेळी तिने केलेल्या मागणीमुळे पुन्हा सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे.सोशल मीडियावर कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून करण जोहरला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी केली आहे. सोबतच करणने मला धमकी दिली होती असंही सांगितलं आहे.

करणने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलताना मी कलाविश्व सोडून द्यावं असंही सांगितलं होतं. सुशांतसोबत सुद्धा असाच कट रचण्यात आला आहे. उरी हल्ला झाला त्यावेळीदेखील त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे, असं कंगना म्हणाली आहे.