तंत्रज्ञानलाइफस्टाईल

वाहनांची देखभाल ‘अशी’ करा

NEWSLIVE मराठी-  अधिक दिवस वाहन सुरु न केल्यास वाहनाच्या बॅटरी आणि इतर पार्ट्समध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला आपल्या वाहनांची देखभाल करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

  • दैनंदिन कामे- वाहन स्वच्छ पुसणे, समोरची काच स्वच्छ, डागविरहित पारदर्शक करावी, वाहन स्वच्छ करून घेणे.
  • साप्ताहिक कामे- इंजिनाचे तेल, कुलंट, पाणी, वायपर्ससाठी असलेल्या टाकीत पाणी भरणे, चाकांची हवा चेक करणे.
  • त्रमासिक कामे- वाहनाची बॅटरी तपासून घ्यावी, पॉवर स्टेअिरग तपासणी (व्हिल बॅलेंसिग) करावी.
  • मासिक कामे- वाहनाचे इंजिन टय़ुनिंग करून घ्यावे, काब्र्युरेटर सेंटिंग करून घ्यावे, ऑइल फिल्टर बदलून घ्यावे.
  •  वाहन सुरू करा आणि हेडलाइट सुमारे 30 मिनिटे सुरु ठेवा. स्मार्ट हायब्रिड टेक आणि लिथियम-आयन बॅटरी असलेल्या वाहनांसाठी महिन्यातून एकदा तरी हे करा.
  • वाहन सुरू केल्यानंतर वाहन मागे पुढे करा आणि टायर्सचा प्रेशर चेक करा. असे केल्याने आपले टायर नुकसानीपासून सुरक्षित राहील.
  • वार्षिक कामे वाहनाच्या चाकातील बेअिरग्ज व सस्पेंशन तपासून घ्यावे, ब्रेकिंगसिस्टीम तपासून घ्यावी, ब्रेक फ्ल्युइड बदलावे, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर, फ्ल्युएल फिल्टर स्वत:समोर काढायला लावून ते बदलून घ्यावे, दरवाजाच्या बिजागऱ्यांना व हँडल्सना ग्रीसिंग करून घेणे, रबराचे भाग तपासून घ्यावे, व्हील असेंब्ली तपासावी, वाहनास गंजविरोधी प्रक्रिया करून घ्यावी.