महाराष्ट्रव्यापार

ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना आता टाटा समूह देणार टक्कर!

देशात उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडताना दिसत आहेत. देशात फ्लिपकार्ट आणि अ‌ॅमेझॉन यांच्यात कायम स्पर्धा होताना दिसते. पण त्यातच रिलायन्स जिओ मार्टने यात पाऊल टाकलं. या सर्व ई-कॉमर्स कंपन्याची एकमेकांमध्ये झुंज चालू आहे. त्यातच आता टाटा समूह ई-कॉमर्स क्षेत्रात उतरत आहे. अनेक क्षेत्रात टाटा समूह कार्यरत आहे.

आता टाटा समूह एक अ‌ॅप बनवण्याच्या तयारीत आहे. या अ‌ॅपद्वारे टाटा समूह विविध ग्राहकांना एकाच ठिकाणी आणणार आहे. टाटा क्लिक, टाटा क्विक आणि टाटा समूहाच्या अन्य सर्व ऑनलाईन माध्यमांच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या अ‌ॅपसाठी ग्राहकांना डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण त्या दरम्यान हे अ‌ॅप लाँच होऊ शकते.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन बोलले,’हे एक सुपर अ‌ॅप असेल. यात अनेक विविध अ‌ॅप असतील. यामुळे आमच्यासमोर खूप मोठी संधी आहे.’ सध्या रिलायन्स समूहाकडे जगातील दिग्गज कंपन्यांचे तंत्रज्ञान आहे. मागील तीन महिन्यात रिलायन्स जिओमध्ये काही परदेशी कंपन्यांनी १.५ लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे टाटा समूहापुढे मोठं आवाहन आहे. येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.