आंतरराष्ट्रीयखेळदेश-विदेश

दहा विकेट घेणारा; मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात

Newslive मराठी-  मणिपूरमधील १८ वर्षीय खेळाडू रेक्स राजकुमार सिंहची भारताच्या अंडर- १९ संघात निवड झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा रेक्स मणिपूरचा पहिला खेळाडू आहे.

तो वेगवान गोलंदाज आहे. २०१८ मध्ये कूच बिहार ट्राॅफीत मणिपूर संघाकडून खेळताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरूणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने ९.५ षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात दहा बळी घेतले होते.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी रेक्सची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi