देश-विदेशलक्षवेधी

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

Newsliveमराठी – केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी ही घटना घडली आहे .

यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.