देश-विदेशबातमी

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

Newsliveमराठी – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे . श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत तर एक जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. नवगाम येथे शुक्रवारी (14 ऑगस्ट) पोलीस पथकावर हल्ला झाला.

नवगाम बायपासजवळ नाकाबंदीच्या वेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसराला घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.