महाराष्ट्रराजकारण

ठाकरे सरकार एक दिवस स्वत: हून पडेल- देवेंद्र फडणवीस

भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र सरकारमध्ये संवाद नाही, महाविकास आघाडी सरकार काही दिवसातच कोसळेल, अशी टीका विरोधक करत आहेत. आमच्या सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे. आम्ही उत्तम कारभार करत आहे, असे सत्ताधारी पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता पुन्हा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकारवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकार हे सुडाच्या भावनेतून काम करत आहे. सरकार पाडण्याची कोणतीच आवश्यकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार एक दिवस स्वत: हून कोसळेल, असे फडणवीस म्हणाले. ज्या दिवशी ठाकरे सरकार पडेल, त्यावेळी परिस्थितीनुसार, गरजेचं वाटल्यास सरकार बनवू’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सरकार जिथे चुकले त्यांच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करण्यास टाळले. याबाबत बोलताना म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांनी जे काही आरोप केले आहे. त्यात काही तथ्य नाही. त्यांच्या आरोप बिनबुडाचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.