महाराष्ट्रशैक्षणिक

ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. हा वाद कोर्टात गेला होता आता कोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे.

देशात तसेच राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून होत होती. यासाठी याचिका देखील दाखल झाल्या होत्या. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती. मात्र आता या निर्णयामुळे परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अनेक विद्यार्थी संघटनेने देखील याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये मोठा संघर्ष देखील झाला सुरू होता. यावरून केंद्रावर अनेकांनी टीका देखील केली.