महाराष्ट्र राजकारण

५६ इंचाची छाती असणारा चौकीदार पळून गेला- राहूल गांधी

Newslive मराठी-  लोकसभेत राफेल प्रकरणावरील चर्चेवेळी ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार एका महिलेला पुढे करू स्वत: पळून गेला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली. ते जयपूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

तुम्ही माझे रक्षण करा, असे त्यांनी सितारामन यांना सांगितले. सितारामन यांनी अडीच तास लोकसभेत किल्ला लढवला. मात्र, आमच्या एका आरोपाचेही त्या धडपणे उत्तर देऊ शकल्या नाहीत.

मोदींच्या काळात थेट नवा करार करण्यात आला. मात्र, हे करताना मोदींनी संरक्षण आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांचे आक्षेप ऐकून घेतले का, असा सवाल आम्ही सितारामन यांना विचारला. मात्र, या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, राफेल व्यवहारात मोदींनी अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये मिळवून दिले असतील, तर त्याचा न्याय होणारच, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *