महाराष्ट्रराजकारण

मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे….

Newslive मराठी-  भारतीय जनता पार्टी ने देशात हुकूमशाही चालवली असून मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्य राहिलेलं नाही, असहिष्णुता वाढलेली आहे. अशा पद्धतीनं हे देश आणि राज्य चालवत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेत केला आहे.

महाराष्ट्र तसंच देशातला एकही घटक आज समाधानी नाही. निवडणुकीच्या काळात राहूल गांधी यांचं गोत्र काढलं. मताचा आणि गोत्राचा काय संबंध? उद्या भाजपावाले माझं गोत्र विचारतील. काय तुम्हांला देणं घेणं? अरे ठाणे, भिवंडी आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा ना. गोत्रं कसली काढत बसला आहात? असंही पवार यावेळी म्हणाले.