बातमीमहाराष्ट्र

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांचे पार्थिव त्यांच्या गावांकडे रवाना

Newslive मराठी  जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहिद झाले. २० जवान जखमी झाले.

सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, भारताच्या या वीर जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत असून, महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शहिद जवान संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड यांच्यावर दुपारी चार वाजता मूळ गावी होणार अंत्यसंस्कार होणार आहेत.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi