बारामती महाराष्ट्र

वडिलांनी सांगून मुलांनी ऐकले नाही…..मुलीने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही

Newslive मराठी- मुलींची छेडछाड व आत्महत्यांची मालिकाच सुरूच आहे.  रोजच्या छेडछाडीला कंटाळून बारामतीजवळील माळेगाव येथे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला.

साक्षी उगाडे असे त्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे मुलांच्या छेडछाडीची माहिती साक्षीने वडिलांनाही दिली होती. वडिलांनीही संबंधीत मुलांच्या पालकांना समज दिली होती. तरीही मुले त्रास देत होते. अखेर साक्षीने हे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात २ मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळ्यात खळबळजनक म्हणजे छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करणारी बारामती तालुक्यातील ही तिसरी मुलगी आहे. बारामती पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *