महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री करताहेत संबंधितांशी चर्चा; रेस्टॉरंट सुरू झाले, धार्मिक स्थळेही उघडणार

सोमवार पासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहे. मंदिरे व इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली आहे.

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली जात होती.

रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे.

विविध राज्यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.