महाराष्ट्रराजकारण

मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला- देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, तरी त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्याकाळात देश रसातळाला गेला, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भाजपतर्फे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे औचित्य साधून व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

पंतप्रनधान मोदी हे एक कणखर नेतृत्व आहे. केवळ बोलणारे नाही, तर काम करून दाखविणारे नेतृत्व आहे. भारताचा हा उज्वल काळ असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या व्यवस्था मोडून काढल्या आणि नवीन चांगल्या व्यवस्था निर्माण केल्या.