मनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही – राम कदम

Newsliveमराठी – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर न्यायालयानं निकाल दिला. दरम्यान, यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेते राम कदम यांनीदेखील सरकारवर टीका केली.

“न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही,” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “सुशांत सिंह राजपुतचे चाहते, कुटुंबीयं अनेक जण त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. सरकार अहंकारामुळे आपल्या भूमिकेवर अडून राहिलं. त्यांनी मुंबई पोलिसांनाही योग्यरित्या काम करू दिलं नाही. त्यांच्या कामात अनेकदा अडथळा निर्माण केला,” असं ते म्हणाले.