महाराष्ट्रशैक्षणिक

जेईई, नीट परीक्षेसंदर्भात फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या

देशात कोरोनामुळे जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील. १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावत परीक्षा आयोजित करण्यास परवानगी देणारा आदेश दिला होता. यामुळे आता सर्वांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

या आदेशावर फेरविचार करावा, अशी विनंती करीत सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या.

फेरविचार याचिकेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत फेरविचार याचिका फेटाळल्या. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ आणि पंजाब या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत फेरविचार दाखल केल्या होत्या. यामुळे आता परीक्षा होणार आहेत.