देश-विदेशमहाराष्ट्रलक्षवेधीलाइफस्टाईलव्यापार

महाराष्ट्र राज्यात मॉल्स सुरु करण्याची तारीख ठरली; परंतु…

Newsive मराठी- महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासोबतच महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनच बंद असलेले मॉल्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ज्यासाठी मॉल्स ओळखले जातात आणि ज्यामुळे तिथे सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता असले अशा थिएटर आणि फूड कोर्टच्या सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे सर्व मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट बंद राहणार आहेत. पण होम डिलिव्हरी करण्यासाटी फूड कोर्ट आणि रेस्टोरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात असंहि नमूद करण्यात आलं आहे.

त्यासोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ऑगस्टपासून परवानगी देण्यात आलीये मात्र, यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा