बातमीलक्षवेधीशैक्षणिक

परीक्षा न घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बहुमतानेच घेतला; राज्य सरकारची माहिती

Newsliveमराठी – राज्यावर करोनाच्या संकटामुळे उद्भवलेला विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

‘यूजीसी’च्या नव्या मार्गदर्शक सूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंच्या बहुमतानेच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.

मात्र, यूजीसीनं परीक्षा घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
करोनामुळे देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे देशभरात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यूजीसीनं नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर करत ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.