आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

अमेरिकेत कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या 45 लाखांवर, तर दीड लाख मृत्यू

Newslive मराठी- जगभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा बलाढ्य अमेरिकेला बसल्याचं दिसत आहे. तसंच अमेरिकेतील कोरोनाबिधितांच्या संख्येनं 45 लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली आहे. 

तर दुसरीकडे वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसारही अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांची संख्याही दीड लाखांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 53 हजार 447 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 1 हजार 267 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi