आंतरराष्ट्रीयकृषी

राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे- सुधीर मुमगंटीवार

Newslive मराठी-  राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे शेती उद्योग फायद्याचा करण्यासाठी असे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कृषी विद्यापीठांनी राजुरी विद्यापीठासारखे अडीच एकरात साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे संशोधन करावे. यासाठी पाहिजे तेवढा निधी अर्थसंकल्पामधून देण्यात येईल.

शेतीचे क्षेत्र पूर्वी सरासरी ४. २८ हेक्टर होते. आता ते १.४४ हेक्टर एवढे कमी झाले आहे. त्यातही बहुपिक पद्धती संपुष्टात आली असून अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात आपण शेतीला विषयुक्त केले आहे. त्यामुळे शेतीला विषमुक्त करण्यासाठी सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.