कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे

Newslive मराठी- आज शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. एकमेव अशी शेतकऱ्यांची जात आहे. जी निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर आपला धंदा करत आहे. शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आज शेतकरी स्वत: च सरण स्वत: रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. आज मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत आहे असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.

दरम्यान, इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही असा टोलाही मुंडेंनी यावेळी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *