महाराष्ट्र राजकारण

सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी

जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहोचला आहे. नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ व्या क्रमांकावर असणारा भारत यावेळी १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे. जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भारतातील गरीब भुकेला आहे कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे.

जागतिक कुपोषण निर्देशांक अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसंच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केली असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. कमी पोषण उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *