आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

मुंबई ते दिल्ली फक्त 12 तासांत, 2 वर्षं आधीच महामार्ग होणार सुरू

केंद्र सरकारने महामार्गावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या मागील सहा वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात हायवेची कामं सुरू असून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली- मुंबई महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी आहे. या प्रकल्पाचे सध्या जोरात काम सुरु असून लवकरच हा महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा महतत्त्वाकांक्षी महामार्ग 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती.

आता सरकारने यावर जास्त लक्ष दिलं असून दोन वर्ष आधीच म्हणजेच 2022 मध्येच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची सरकारची योजना आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुरू होण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ते या रस्त्याच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असून हा महामार्ग चालू झाल्याने संपूर्ण देशाला याचा आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. याचसोबत राज्यात देखील अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत.